Skip to Content
ग्रामवार्ता
आमच्या येडे गावामध्ये होणारे कार्यक्रम आणि उपक्रम याबद्दल माहिती.

युवा महोत्सव 2025
by ग्रामपंचायत येडे
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर युवा महोत्सव २०२५ दिवाळीच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने प्रयाम प्रतिष्ठान यांच्या वतीने आमच्या मौजे येडे (ता. कडेगाव) येथे दोन दिवसांचा युवा महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दिनांक २२ व २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत पटांगण, येडे येथे सायंकाळी ठीक 6 वाजता भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे. महोत्सवाचा पहिला दिवस – २२ ऑक्टोबर : या दिवशी पंचक्रोशीतील सर्व गावांच्या सरपंच व उपसरपंचांचा “आदर्श गावकारभारी” या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे. हा सन्मान महाराष्ट्रातील पहिले आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मा. सुशांत देवकर यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे. तसेच पंचक्रोशीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत उच्चांकी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना “आदर्श शेतकरी” हा सन्मान देण्यात येईल. आमच्या येडे गावातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामस्थांना “ग्रामभूषण” हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमात कडेगाव तालुक्यातील युवक व युवती आपले कलागुण सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक शिवम डोंबे करणार आहेत. महोत्सवाचा दुसरा दिवस – २३ ऑक्टोबर : या दिवशी आपल्या पंचक्रोशीतील माताभगिनींसाठी झी मराठी फेम मा. निलेश पापत यांचा लोकप्रिय “होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विजेत्यांसाठी फ्रिज, वॉशिंग मशीन, कुलर, इलेक्ट्रिक शेगडी, मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच ५ उत्साहवर्धक पैठणी बक्षिसे देखील दिली जाणार आहेत. तरी या सुवर्णसंधीचा लाभ कडेगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.